The Result
"तिळगुळ घे आणि गोड बोल" म्हणत राज नं मीठी मारली आणि मला संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
कॉलेज च्या वेळे आधी जवळ जवळ 1 ते 1.30 तास आम्ही लवकर आलो होतो. संक्रांतीचा दिवस. थंडी जरा वाटली येताना कॉलेजात. आधीच्या दिवसा पेक्षा थोडी जास्त.
"काय मग राज, आज काय संक्रांत special? " मी विचारलं.
"काय नाय बघ...फक्त गुळपोळी बाकी काय नाही..."
तो म्हणाला.
"काय नाही कसं हे आणला आहेस कि कुठला तर कलर लावलेले तिळगुळ.... च्या मारी गोड कमी कडू जास्त लागलं " मी चिकट झालेले हात पुसत म्हणालो.
"ये गप खा आणि तोंड बंद ठेव" शिवी हसडत तो म्हणाला.
"गोड बोला" या वाक्याची लक्तरे वेशीवर टांगली तीही
संक्रांतीच्या सकाळी.
"चला भावांनो चहा टाकून येऊ" गडबडीत आलेला सौरभ आम्हाला म्हणाला.
"चला जाऊ आणि जरा चुना लावूया त्या कॅन्टीन वाल्याला..." राज म्हणाला.
"साल्या आज तर नको संक्रांत आहे" हसत सौरभ म्हणाला. सॅक वैगरे नीट ठेवून आम्ही कॅन्टीन ची वाट धरली.
जाताना ग्राउंड वर लक्ष गेलं. लगबग चालू होती कसली तरी. रोलर फिरत होते. टँकर नं पाणी मारणं चालू होतं.
"काय हेलिपॅड तयार करत आहेत का?" सौरभ न विचारलं.
"होय वाटतं कोण तर येणार असेल मंत्री वैगरे" मी म्हणलो.
"चला आपण जाऊ कॅन्टीन ला तिथं कळेल सगळं कोण येणार आहे कधी येणार आहे." सौरभ म्हणाला.
कॅन्टीन मध्ये वर्दळ कमी होती. चुना लावण्याचा आमचा प्लॅन फसणार होता. कारण जरा गर्दी असली कि गंडवायला बरं पडतं.
"चला काढा 10 रुपये" त्रासिक स्वरात राज म्हणाला.
कारण चुना लावायचा ओरिजिनल प्लॅन त्याचा. त्याच्या मदतीनं आम्ही आत्ता पर्यंत 300 ते 400 रुपये वाचवले होते.
तो वाफाळलेला चहा आणि पार्ले चा एक पुडा असं घेऊन आम्ही मधल्या टेबल वर जाऊन बसलो.
ग्राउंड वरची कामाची लगबग वाढली होती. तिथून सगळं दिसत होतं. गडबड चालू होती सगळी.
मागच्याच टेबल वर दोन watchman बसले होते.
त्याना मीच विचारलं काका कोण येन आहे आज म्हणून.
"कोण ते आपले शिक्षण मंत्री येणार हाय. कार्यक्रम हाय म्हण त्यांचा इकडं कुटं तर...फुकटची ड्युटी लावलीय बघ...वाढीव पगार पण देत नाय बग.." माझ्या प्रश्नाचं उत्तर देता देता त्यानं आपली समस्या हि मांडली.
"आज त्यांना बघूनच जायचं. Lecture बुडाले तरी चालेल." मी म्हणालो.
मंत्री ला बघायचं या गोष्टीमुळं नाही तर lecture बुडवायचं या मुळं सौऱ्या आणि राज्या सुखावले.
चहा ची तल्लफ भागली आणि आम्ही निघालो.
आता त्या हेलिकॉप्टर ची प्रतीक्षा करत आम्ही बसलो.
वर्तक हॉल चा तो कट्टा आज चांगला साफ केला होता.
एरवी तीन चार कुत्री असायची तिथं मात्र आज तीही दिसत नव्हती. मंत्री येणार म्हणून चांगला करून ठेवला होता परिसर. पण अचानक काय झालं काय माहित राज किंचाळला "भावांनो आज result आहे."
"कोण सांगितलं?" मी विचारलं.
"अरे माहिते मला कुणाला पण विचार वर्गात" राज म्हणाला.
ह्या बातमी पासून आम्हीच अनभिज्ञ कसे ह्याच आश्चर्य वाटलं.
"आयला संक्रांतीच्या दिवशी वाईट बातमी समजणार म्हणजे" त्रासिक स्वरात सौऱ्या बोलला.
आपण कितीही चांगला पेपर लिहा....भले तुम्ही मागच्या परिक्षेमधले topper का असेना "निकाल" म्हटल्यावर फाटायची ती फाटतेच. आता मात्र कशात लक्ष लागत नव्हतं. तिकडं मंत्री साहेबांच्या स्वागताची तयारी जोरदार चालू होती. मनात भीती दाटली होती.
अश्या परिस्थिती मध्ये तोंड हसरं दाखवणं किती मुश्किल आहे ते समजत होतं. आपण पेपरात काय लिहलय कसं लिहलय हे फक्त आणि फक्त अपल्यालाच माहित असतं त्यामुळेच कदाचित आतून वाटणारी भीती साहजिक असावी.
"आज नाय लागत रे result.... " दगड ग्राउंड च्या दिशेने भिरकवत सौऱ्या म्हणाला. स्वतःच्या समाधानासाठी. आताचा त्याचा स्वर जर अधिकच त्रासिक होता.
"चला आपण lecture ला जाऊ. तसही इथं लक्ष लागत नाहीय. बाकीच्या पोरांना भेटलं कि जरा टेन्शन कमी होईल." असं मी म्हणताच क्षणार्धात आम्ही वर्गाकडे जायला निघालो.
वर्गात पोचलो तेंव्हा lecture चालू व्हायला अजून 10 मिनट तरी होते. वर्गात सगळे आपापल्या कामात गुंतले होते. पहिल्या बेंच वरच्या पोरी अभ्यास करत बसलेल्या ..... तिसऱ्या चौथ्या बेंच वरच्या पोरी गप्पा मारत बसलेल्या आणि बॅक बेंचर्स सेल्फी घेत होत्या. कदाचित #beforeResult या कॅप्शन साठी त्या सेल्फी घेत असाव्यात.
पोरांच्या घोळक्यात मात्र सर्व काही नेहमी सारखे चालले होते. खिडकी जवळ किरण्या आणि सादिक भाई गाणी ऐकत बसले होते. मागच्या बेंच वर आश्या व्हाट्स अँप वाचत बसला होता. बाकीच्या बेंच वरती गप्पा चालू होत्या. आम्ही आमची जागा पकडली.
सारं काही नेहमी सारखं होतं पण आज सगळ्यांचा चेहऱ्यावर थोडे टेन्स भाव दिसत होते. आमच्यात result बाबत थोडी चर्चा झाली. सगळी घाबरली होती पण अविर्भाव मात्र "लागला लागूदे आम्हला काय फरक पडतो" असा होता. मग थोडे हास्य विनोद झाले. फकाट मारून झाले. हसल्या मुळे थोडं टेन्शन दूर झालं. इतक्यात सर आले. आणि मग सगळं जरा शांत झालं. सेटल झालं. मला lecture मध्ये इंटरेस्ट नव्हता. मला का आमच्या पोरांच्यात तो कुणालाही नव्हता. Result चा चिंतेत सगळी आपली शरीरानं नुसती वर्गात होती मन मात्र त्या result कडे होती.
शिकवणं चालू होतं... मी मात्र वहीत काय तर गिरगोट करत बसलो. इतक्यात हेलिकॉप्टर चा आवाज झाला.
मंत्र्यांचे आगमन झालं. फटाक्यांची माळ उडाली. याचा जरा डिस्टर्ब झाला lecture मध्ये. पण परत 10 मिनटात सगळं चालू झालं.
पुढची दोन lecture हि डोक्यावरून गेली. हल्ली का कुणास ठाऊक lecture डोक्यावरून जायचं प्रमाण वाढलंय असं वाटलं. लंच मध्ये आमची "या आधीचे निकाल" या विषयावर वादळी चर्चा झाली. सगळ्यांनी निकालाला कसं तोंड दिलं.... निकाला नंतर च्या भावना .... निकाल पोरांची वाट कशी लावतो ... या वर बोलणं झालं.... बोर्डाचा उद्धार झाला.... एकानं तर त्याला त्याच्या बापानं कस मारलं निकाला नंतर हे सांगितलं. या वर सगळे आम्ही खूप हासलो.
मग नंतर ची lectures करायची कि नाहीत या वर विचारविनिमय झाला. आणि पुढची सगळी lecture फाट्यावर मारायची या वर शिक्का मोर्तब झाला. मुलींनी सुद्धा या वेळी पहिल्या झटक्यात परवानगी दिली. सहसा पोरी कॉमन ऑफ ला नाही म्हणतात. आज मात्र त्यांनी परवानगी दिली. यातूनच त्यांनाही टेन्शन आलाय हे समजत होतं.
वर्गातून निघालो. आज संक्रात आहे हे हि सगळे विसरून गेले त्या result च्या नादात. गार्डन मध्ये पोचलो तेंव्हा दोन वाजले होते. आता मात्र निकालाची वेळ जवळ येत होती. 4 चं timming दिलं होतं. मात्र पूर्वानुभव असं सांगतो कि बोर्डाचा निकाल कधीही धडकतो. त्यामुळं धाकधूक वाढत चालली होती.
सौऱ्या आणि किरण्या नं तर रूम वर परत जाण्याचा निर्णय घेतला. तसही या नंतर आम्ही lecture अटेंड करणार नव्हतो. सो त्यांनी आमचा निरोप घेतला. इंद्रा नं त्यावेळी त्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा आणि "बेस्ट लक" दिलं. तेव्हा बाकीच्या पोरांच्या डोक्यात प्रकाश पडला कि आज संक्रांत आहे. मग सगळ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या...बेस्ट लक पण दिलं.
थोडा वेळ गार्डन मध्ये घालवल्यावर आम्ही ग्राउंड कडे जाण्याचा निर्णय घेतला. ग्राउंड वर ते हेलिकॉप्टर दिमाखात उभं होतं. अनेक पोरं त्याचा फोटो घेत होती.
कॉलेज मधली वर्दळ वाढत होती. निकालाची वेळ जवळ येत होती. अजून तरी "लागला रे " असं काही कानावर पडलं नव्हतं. आता मात्र फाटू लागली होती. भीती मनात घर करु लागली होती. सादिक नं हि भीती आम्हाला बोलून दाखवली. बोर्डाच्या नावे शिव्या घालून झाल्या.
काही वेळ गेला आणि तो प्रसंग आलाच. निकाल लागला होता. हि बातमी वाऱ्यासारखी पसरली. सगळ्यांच्या हातात मोबाईल दिसू लागले. पोरं ग्रुप करून थांबली होती. मी हि माझा मोबाईल काढला.
नेट चालू केलं. व्हाट्स अँप, फेसबुक ची नोटिफिकेशन पडू लागली. नोटिफिकेशन्स च्या नादात फोन हँग झाला. पोरांनी फोन चा उद्धार केला. शिव्या शाप दिले त्या फोन ला. Finally सुरळीत चालू झाला.
"Chrome वर जा कि येड्या" राज्या ओरडला.
हात थरथरत होते. त्या नादात chrome वर क्लिक करायचं सोडून मी मॅप वर टॅप केलं.
"च्या आयला कुठं लक्ष आहे रे येड्या" सगळी किंचाळली.
"हो दम खावा कि जरा " मी त्रासलो.
लिंक टाकली....आणि एंटर....
'Enter your seat number" असा टॅब दिसला.
आता पहिला कुणाचा पाहावा यात जुंपली. शेवटी मलाच टाकावा लागला माझा नंबर.
मी नंबर टाकला पण "search result " वर क्लिक करायला हात धजावत नव्हता. शेवटी क्लिक केलाच.
मार्कलिस्ट यायला जरा वेळ गेला....शेवटी ती हि आलीच. ऑल क्लिअर होतं सगळं...पहिला सुस्कारा...
फर्स्ट क्लास विथ distinction.... दुसरा सुस्कारा...
85 टक्के...आनंदाला भरतीच आली.
"भावा जिंकलास बघ...आता पार्टी....अभिनंदन..." असे शब्द सगळ्यांकडून ऐकायला येत होते.
हळू हळू सगळ्यांचे मार्क समजले. 80 च्या खालचा आकडा ऐकू येत नव्हता. पोरींचा तर 90 च्या आसपास होता.
एकंदरीत पाहता बोर्डानं अपेक्षेपेक्षा कमी मारली होती.
निकाल हा आमच्या दृष्टीनं 'लई भारी' , टीचर्स च्या दृष्टीनं 'बरा' आणि पालकांच्या दृष्टीनं 'ठीक आहे' या टाईप चा लागला होता.
वातावरण result मय झालं. आम्ही एकमेकांना अभिनंदन दिलं. Topper आलेल्या सौऱ्या ला बुकलून काढलं. आनंदात आम्ही सगळी आपापल्या दिशेला निघालो. दिमाखात उभारलेल्या त्या हेलिकॉप्टर चा निरोप घेतला. त्या भोवती आता सुरक्षा वाढत होती.
गार्डन पाशी चित्र भारी होतं. कमी मार्क पडलेली पोरं एकमेकांना धीर देत होती. KT मिळालेली पोरं पुन्हा एकदा पेपर द्यायला तयार झाली. काही पोरींच्या डोळ्यात अश्रुंचे साम्राज्य राज्य करत होते. अश्रूंनी अचानक आक्रमण केलं होतं. काही पोरी सेल्फी काढत होत्या ... बहुतेक #afterResult या कॅप्शन साठी.
मी घरी जायच्या वाटेला लागलो.मोबाईल पहिला तेव्हा नेट तसंच चालू होतं. फेसबुक वर भासभस नोटिफिकेशन पडले होते. व्हाट्स अँप वर पण काय तर '112 msg from 8 conversations' असं नोटिफिकेशन पडलं होतं. मी दुर्लक्ष केलं.काय पण म्हणा आजचा निकाल खास लागला होता. घरी मी अजून कल्पना दिली नव्हती. आज मात्र गुळपोली ची खरी चव चाखता येणार होती. आनंदित होऊन मी निघालो...समाधानात ते गार वार अंगावर घेत....एकदम खुशीत.....आणि शिक्षण मंत्र्याला बघितलं नाही या दुःखात...
©Gsumitt
Kadak re bappya......
ReplyDelete