Bike Mates


तसे आता कॉलेज संपून 8-10 दिवस झाले....
झाले म्हणण्यापेक्षा गेले.....काही दिवसापूर्वी bore वाटणारं कॉलेज आता फक्त आठवणीच्या क्षितिजवरच  राहणार...😢
Main sub कड येतो....तो म्हणजे bike mates...
आम्ही तिघे म्हणजे मी,राज्या आणि sadyaa आम्ही classmates असलो तरी आधी आम्ही bike mates..... clg चालू झाल्यापासून आम्ही एकत्र जायचो clg मध्ये.....
सगळं कसं ठरलेले....
सकाळी 8 ला sadyaa चा कॉल येणार ' हॅलो bellya कुठं आहेस...कधी येणार'
माझं उत्तर 5 min मध्ये येतो भावा....
आमचं हे बोलणं होतंय तोवर rajyaa चा phone अरे कुठं हायस....???
हे सगळं अगदी ठरलेले....विशेष म्हणजे यात कधी खंड पडला नाही....तेच संभाषण .... तीच वेळ....काही बदललं नाही दोन वर्ष....☺☺
गाडी वरून जाताना अनेक किस्से घडले.... आज सगळं काही आठवलं ना हसू येत आमचा आमच्यावर....😀😀
विचार येतो मनात काय काय केलं हे आपण....
गाडी वर जाताना अगदी राजकीय विषय ते अगदी फकाट चर्चा सगळं काही चालायचं.....
राज्या चा मोठा आवाज....sadyaa चे प्रश्न.....माझी उत्तरं.... सगळं काही miss करतोय मी आजकाल....😢😢
आम्ही तिघं नेहमी एकत्र यायचं जायचं....त्यामुळे ट्रॅफिक वाले पण ओळखीचे झाले.....पोलीस मित्र झाले....दाबेली भेळ गाडी वाले उधारी देणारे दोस्त बनले...
So आता फक्त आठवणी शिल्लक आहेत....आता परत आम्ही तिघं एकत्र गाडी वरून जाऊ नाही जाऊ माहित नाही....पण मला माहिते आमच्या तिघांपैकी एकही जण आमची गाडी विसरू शकणार नाहि....आमची हि  सुंदर जर्नी विसरू शकणार नाही.....
©G sumitt

Comments

Popular posts from this blog

Friendship

The Result