Friendship
मैत्री....दोनच अक्षरं या शब्दात....पण एक प्रकारचं जग सामावल आहे या शब्दांत.... मैत्री हे असं एकमेव नातं आहे जे तुटू शकतं पण विसरता नाही येऊ शकत...मित्र लांब जाऊ शकतात पण मैत्री लांब नाही जाऊ शकत..!! ☺☺
आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर आपल्याला मित्र भेटत असतात.मग आपण त्यांना categorise करू लागतो....तो लांबचा मित्र,तो गल्लीतला मित्र,तो शाळेतला मित्र,अमुक अमुक मित्राचा मित्र इत्यादी..
ते काही असो पण मित्र हे आपल्याला हवे असतातच.
मित्रच नाहीत असे सहसा घडत नाही.मित्र हे पहिजेतच.मन share करायला...मन का फक्त अगदी सर्व काही....!! ☺☺
आपण अगदी पहिल्या पासून चालू करू ना म्हणजे शाळेपासूनच....शाळेत गेल्यावर प्रथम दिवशी आपल्या वर्गात जो कोणी पहिल्यांदा भेटेल तो आपला मित्र होऊन जातो.अगदी पहिल्या दिवशीच. मग हळू हळू एकाचे दोन, दोनाचे तीन, मग दहा पंधरा जणांचा ग्रुप तयार होतो.मग काय झालंच.... चालू करायचा मग धिंगाणा,exam मध्ये एकत्र कॉपी, एकमेकांच्या प्रगती पत्रकावर "पालकांची सही" असे नानाविध प्रकार...!!!
त्याच ग्रुप मध्ये मग आपण division करत असतो.प्रत्यक्षात नाही पण मनातून.ती division म्हणजे "बेस्ट friend" ची.
मुळात म्हणजे मला best friend हि concept च आवडत नाही कारण एक आपण एकदा त्या मित्रांची image मनात तयार केली कि ती पुन्हा बदलत नाही,
दुसरं आपण त्याच्या कडून काही तरी अपेक्षा ठेवतो आणि तिसरं म्हणजे जर आपण आपल्या best friend चे best friend नाही हे जेंव्हा आपल्याला समजतं तेंव्हा ते दुःख खूप मोठं असतं. मनाला विचलित करणारं असतं..☺☺
असो...मैत्री हि आपण explore करायला पाहिजे....खरच आपण तिथं कुठं तरी कमी पडतो असं वाटत मला.... मैत्रीचे अनेक कांगोरे आहेत...मैत्रीत shades आहेत...त्या आपल्याला समजायला हव्या....
आता आमचं उदाहरण घ्या. आमच्या मैत्रीचं...
आमचा ग्रुप म्हणजे आम्ही 16 पोरं.... आमच्या "ग्रेट" महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या region मधली पोरं... प्रत्येकाची बोलण्याची style वेगळी...culture वेगळे...बोलीभाषा वेगळी...(म्हणजे भाषा मराठीच पण tone वेगळा) आणि बाकीचे अनेक factors आहेत...☺☺
आम्ही 16 जण प्रथम pure सांगलीकर झालो....
नंतर मग pure walchdites..!!
आणि सगळ्यात महत्वाचे आम्ही "true friends" झालो...!! 😘😘
आम्ही तसं बघायला गेलं तर मागची तीन वर्ष एकत्र आहोत.या तीन वर्षातला प्रत्येक दिवस आमच्या मैत्री साठी वेगळा होता.मित्र हेच जग झालं होतं. पण हे मित्र माझ्या पाठी माग आपल्या बाबतीत काय बोलत असतील ते चांगलं असुदे अथवा वाईट मी याचा विचार कधीच केला नाही...त्या मुळे असेल कदाचित आमची मैत्री घट्ट आहे.....खरच आहे आम्ही "true friends" आहोत ते या विचारा मुळे ...!!
दररोज रात्री झोपताना विचार येतो मनात कि बहुतेक नियती च्या मनातच असावं कि आम्ही भेटावं मित्र म्हणून life च्या या phase मध्ये.....
हे सगळं जेंव्हा अनुभवला ना तेंव्हा शाळेतली मैत्री आणि आता कॉलेज मध्ये झालेली मैत्री यात किती फरक आहे.मैत्रीच्या नात्यात एक maturity म्हणतो ना ती आली होती.....भावना समजायची ताकद होती....चांगला वाईट निवडण्याची क्षमता होती...☺☺
पण या अश्या mature मैत्री चा एक disadvantage म्हणजे "अतिपरिचयात अवज्ञा"
मैत्रीच्या सीमा काही वेळा दूर जातात आणि personal life मध्ये अति involvement होते आणि मग गैर समाजाचा खेळ...मग हि अनेक दिवसाची मैत्री लयास जाऊ शकते...असे अनेक प्रसंग आपण पहिले असतील अनुभवले असतील कदाचित...! पण हि झालेली भांडण हि मैत्री मुळेच होतात तर ती मैत्री मुळे सुटू हि शकतात.....टोकाची होणारी भांडणं हाच काय तो घट्ट मैत्रीचा तोटा आहे असं मला वाटतं.... पण हे हि तितकाच खरं आहे कि "Friendship is the cause then friendship is the only solution !! " ☺☺
©gsumitt
Comments
Post a Comment