आठवण

तो दिवस अजूनही आहे माझ्या लक्षात....
कॉलेज चे दिवस....अजूनही तो प्रसंग डोळ्यासमोर आहे....खूप दिवस झालेत आता या गोष्टीला....पण तो प्रसंग अगदी जसाच्या तसा माझ्या डोळ्यासमोर आहे....तिला पहिल्यांदा पाहिलं त्या वेळचा.....
सकाळची दोन लेक्चर झाली होती. माझा आपला नेहमीचा टाईमपास चालला होता कॅन्टीन मध्ये....सगळे व्यस्त होते कुणाची चेष्टा चालली होती....कोणी सर लोकांची खेचत होते...कोणी जाणाऱ्या येणाऱ्या पोरींवर लाईन मारत बसलं होतं.... तर कोणी सो कॉल्ड नॉन व्हेज जोक वर खिदळत होतं.... मी हि यात सामील होतो म्हणा.....त्या खिदळण्यात... त्या चेष्टा मस्करीत....असंच आमचं चालू होतं.... तेवढ्यात माझं बाहेर लक्ष गेलं....4 मुली कॅन्टीन च्या दिशेनं येत होत्या....आता पोरी येत आहेत म्हटल्यावर आमच्या पोरांचं लक्ष जाणार नाही असं होणार नाही....लगेच यांचं चालू झालं.... तश्या इतर पोरी हि ये जा करत होत्या पण त्या ग्रुप नं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं....कारण त्यांना आधी कधी इथं पाहिलं नव्हतं...फर्स्ट इयर च्या असाव्यात असा अंदाज निघाला.....मग आता पोरींबद्दल चर्चा चालू झाली...कोण कुठली असेल...कुठं राहत असेल...आणि इतर फालतू गोष्टी.....अखेर त्या चार पोरी कॅन्टीन मध्ये आल्या....त्यात ती सुद्धा होती...ती जेंव्हा दूर होती ना अगदी तेंव्हा पासून मी तिला पाहत होतो.....छान वाटली मला...त्या वेळच ते आकर्षण....पण जेंव्हा तिला समोरून पाहिलं ना तेंव्हा ती खूप सुंदर आहे हे मला कळून चुकलं...अगदी अश्या समोरच्या टेबल वर बसली होती....का काय माहित माझं इकडं तिकडं कुठंच लक्ष नव्हतं....माझं लक्ष फक्त तिच्याकडेच होतं.... अगदी ती तिथून निघे पर्यंत....ती गेली ना तेंव्हा तिथून काय माहित एक हसू आलं होतं चेहऱ्यावर....ते आकर्षण म्हणतात ते हेच का असं वाटलं त्या वेळी....आता यात एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे मी तिच्या कडे इतका वेळ बघत होतो ते माझ्या मित्रांना समजलं नाही त्यावेळी...बरं झालं नाही समजलं साल्यानी जगू दिलं नसतं नंतर....खूप वेळ चालला आहे असं लक्षात आल्यावर सगळी निघालो आम्ही....सगळी जण आपापल्या वाटेला लागली....कुणी लेक्चर करेल अशी चिन्ह दिसत नव्हती...पण मी मात्र क्लासरूम कडे वळलो.
लेक्चर चालू झालं. सर काय ते समजत नसलेलं शिकवत होते. अर्थात माझं लक्ष नव्हतं. लक्ष नव्हतं म्हणण्यापेक्षा डोक्यात वेगळा विचार चालू होता.....तिचा....
जात नव्हती नजरेसमोरून....खूप आवडली होती त्याच वेळी मला ती...सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे तिचं ते smile... चेहऱ्यावरचं हसू...किती गोड हसत होती ती त्या वेळी....आत्ता कळतंय ह्याच त्या गोष्टी असतात ज्यानं आकर्षण प्रेमात बदलत.
अशी एका मागं एक लेक्चर होत गेली मी मात्र तिच्यातच होतो. इतकीच ती पहिल्यांदा पाहिलं तेंव्हा ची आठवण....त्या दिवशी मी फक्त तिचाच विचार करत होतो....आणि ती पुन्हा दिसावी या साठी प्रार्थना !!

आठवणी......त्याच तर आता मागे राहिल्या होत्या....आठवणी....मला मोकळं व्हायला भाग पाडणाऱ्या..... आठवणी मला त्रास देणाऱ्या....कधी हलकेच हसू देणाऱ्या....कधी डोळ्यातून पाणी आणणाऱ्या....अश्या कितीतरी अनेक.....आता फक्त त्याचंच अस्तित्व होतं माझ्या पुढ्यात.

त्या दिवशी ती अचानक मला भेटायला आली. तसं आमचं आधी आज भेटूनच जाऊया वैगरे असं काय ठरलं नव्हतं. पण ती आली होती. पाऊस भरून आला होता. बसलो आम्ही कॉलेज च्या गार्डन मध्ये. आमच्या अनोळखी असण्यापासून ते मित्र या प्रवासात तिच्या अनेक गोष्टी मला समजल्या. त्यातली एक म्हणजे तिला पाऊस खूप आवडायचा. आडोश्याला उभारून तो आसमंत न्याहाळायची. मनात आलं तर मनसोक्त भिजायची. स्वछंदी. लहरी. अल्लड. अगदी पाऊसाप्रमाणे.
नेहमी प्रमाणे त्या दिवशीही आमच्यातला संवाद चालू व्हायला 10 मिनिटे तरी गेली. आमचं दर वेळी असंच का व्हायचं समजायचं नाही पण व्हायचं मात्र.
तशी ती खूप बोलायची. मन मोकळं करून. सगळं काही share करायची. पण त्या दिवशी काय माहित बोलायला जरा चाचपडत होती. मी आपला काय तरी फालतू वाले विनोद करून तिला हसवत होतो. कारण तिचं ते हसू तिच्या सौन्दर्यात भर टाकायचं कायम. आणि आणखीन प्रेमात पडायचो मी तिच्या. ते smile गुंतवत होतं मला तिच्यात. ती मात्र तिला जे बोलायचं आहे ते बोलणारच होती त्याच दिवशी कदाचित. तिची ती व्यक्त होण्याची ओढ जाणवत होती. आणि तिनं धीर एकटवला आणि ती बोलून गेली."प्रेम करायला लागलेय मी तुझ्यावर" अजून आठवतंय मला हेच ते शब्द आणि ती आता बोलकी झालेली नजर आणि तो त्या क्षणी चालू झालेला तिचा आवडता पाऊस.....

काय होता नाही तो क्षण.....दोन अनोळखी म्हणून चालू केलेला प्रवास....नात्याच्या एका सुंदर वळणावर वळण घेईल असं कधीच वाटलं नव्हतं. किती रम्य असतो नाही हा प्रवास. कुठं नेऊन पोचवेल माहित नसतं पण आपण जगत असतो त्यातल्या प्रत्येक क्षणाला....या प्रवासात अनेक अडथळे हि येत असतात....पण विश्वास, नातं,  मैत्री पक्की असली की हे अडथळे नक्कीच दूर होतात. असाच आमचा प्रवास चालू राहिला. नातं घट्ट होत गेलं. प्रेम वाढत गेलं.

सगळं काही अनुभवत होतो आम्ही. तो पहिला स्पर्श....तो भिडणारा श्वास....ती मिठी....तो पहिला kiss...शरीरानं एकमेकांच्या जवळ येणं....ती लाजरी नजर ....आणि नात्याला सहजीवनाच्या पुढच्या टप्प्यावर घेऊन जाण्याचा घेतलेला निर्णय....

हा प्रवास खूप रम्य होता आमचा.
पण त्या वेळी कुठं माहित होतं.... प्रवास हा असा संपेल.....मी हुंदका आवरत सगळं काही सांगत होतो....माझा मित्र मला सावरत होता....
"आता आपल्याला जायला हवं....चिता हि आता शांत झालीय."
हो "तिची" चिता. खूप रडलो त्या वेळी मी. जिच्यावर इतकं प्रेम केलं....जिच्याबरोबर आयुष्याची नवीन सुरवात करणार होतो....जी त्या नात्याच्या प्रवासात आपली कायम साथ देईल असं वाटायचं तीच आज निघून गेली होती मला सोडून....मला एकट्याला टाकून.....या एका अपघाताने सारा प्रवास कोलमडून गेला. स्वप्नांचा चुराडा झाला.
स्मशानातून आम्ही बाहेर पडलो.....मागं वळून पाहू वाटत नव्हतं.....पुढं जायची हिम्मत होत नव्हती....पुढं दिसत होता तो फक्त अंधार....आणि त्रास द्यायला तयार असलेल्या आठवणी..................
©gsumitt

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Friendship

The Result

Bike Mates