तू अशी निघून गेलीस.....

तू अशी निघून गेलीस....चटकन...माझ्या समोरून....
मला सावरायला तरी थांबायचं होतंस.....
माहिते मला म्हणजे आत्ता कळतंय की तुझ्या दृष्टीनं ते प्रेम वैगरे सगळं खोटं होतं....
असं काय झालं की तू अशी निघून गेलीस....माझ्यासमोरून....
निदान माझं थोडं तरी ऐकायचं होतं....
किती त्रास होतोय माहिते तुला.....जवळच माणूस...माफ कर हं... मला वाटायचं की ते जवळच माणूस आहे म्हणून....जवळचं माणूस असं दूर जाताना....ते ही अचानक....एकाएकी.....
झिडकारण खरंच इतकं सोपं आहे....इतकं....
सहवासाचे ते सुंदर क्षण असे विसरू शकतं का कोणी....इतक्या लगेच....
ती बोलणारी...संवाद साधणारी नजर....कोणी इतक्या सहज तोडून कसं जाऊ शकतं....
तो स्पर्श...दृढ होत जाणारा... ती घट्ट होणारी मिठी....गुंतत जाणारा श्वास...हरवत जाणारं देहभान....प्रेमाचा तो परमोच्च क्षण...मनही इतकं लाजाळू व्हावं त्या क्षणाला....तो क्षण.....फुलत जाणारं तुझं ते मधुर हास्य....प्रत्येक श्वासाला तुझी होणारी आठवण....तुझं रडणं...तुझं रुसणं....तुझं समजूत घालणं.... हे सारं.... इतकंच नाही तर तुझ्या वर केलेलं प्रेम....अपार....मनापासून....अगदी मनापासून....हे सगळं हिरावून घेतलंस तू माझ्याकडून ...तू जाताना....
मला वाटलं इतकं झालं...तू सुद्धा हुंदके देत रडत जाशील...ते सिनेमात दाखवतात ना....अगदी तसं वाटलं माहिते....म्हणजे तू अशी जाशील...चार पाऊलं... मग पुन्हा येशील माझ्याकडे....अशी धावत...थोडी रडत....घट्ट मिठीत येऊन पुन्हा माझी होशील.....
तेव्हा समजलं सिनेमा किती खोटी स्वप्न बघायला भाग पाडतो ते....
तू आलीसच नाहीस....
कागद चुरगळावा तसं तू त्या क्षणाला चुरगाळून बाजूला केलंस....
तू अशी निघून गेलीस चटकन....माझ्या समोरून....
थांबायचं ना थोडं....
माझी आसवं तुला पाहिला उंबऱ्यापाशी जमली होती.....
©gsumitt

Comments


  1. दुःखांच्या खोल समुद्रात मनाच्या शिंपल्यांतून आठवणींचे मोती शोधावे असं लिहील आहेस.

    ReplyDelete
  2. itak serious nko Hou
    Kuthetari vajan kami hoil

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Friendship

The Result

Bike Mates