"तुम्हाला वाटतंय तसं नाहीय..."
"अजून किती दिवस असा नोकरी शोधत हिंडणार आहेस? पी हा चहा. गार होईल." कपबशी माझ्यासमोर आदळून ती आत निघून गेली. समोरून गेली असली तरी तोंडाचा पट्टा चालूच होता तिचा.
'वैताग यायचा. दिवसभर वणवण भटका...लोकांच्या पाया पडा...नोकरीसाठी अर्ज करत बसा... आणि संध्याकाळी घरी आल्यावर...पैसे आता संपत आलेत...आधी कुठं अशी लाख भर पगाराची नोकरी होती...त्यात आणि savings च्या गोष्टी करताय...हे आणि ते...खरच वैताग यायचा. वाटायचं सगळा त्रास ही एकटीच सहन करतीय आणि मी आपला बसलोय पाय पसरून निवांत. माझी वणवण दिसत नव्हती कुणाला. आणि सांगणार तरी कुणाला...कुणाशी बोलायचे पण वांदे झाले होते. कुणाकडे गेलो की त्यांना वाटायचं पैसे मागायला आलाय...लोक तोंडावर बोलून निघून जायचे. परिस्थिती पण काशी असते ना...भोगायला लावणारी. मागच्या जन्मीचं पाप भोगतोय म्हणून किती दिवस समाधान मानायचं. रोजचंच झालं होतं...ती आदळआपट, ते बोलणं, रडणं...आता या बद्दल वाटायचही बंद झालं होती. इतकं सगळं टोकाला जात होतं या गेल्या काही दिवसात. मात्र एक दिवस मी ही तोंड उघडलं.'
"काय चाललंय तुझं रोजचं... जरा स्वस्थ बसू देशील का मला...what is your problem ?? "
"बस असाच आयुष्यभर बिनकामाचा..."
" Listen, काय हे सारखं बिनकामाचा वैगरे लावलंय... अशी काय वर्ष वैगरे उलटली नाहीत नोकरी जाऊन...जेमतेम महिना झाला असेल...आणि हो इतका का त्रास होतोय तुला...म्हणजे नोकरी होती...व्यवस्थित पैसे वैगरे मिळत होते तेंव्हा सगळी तोंडं बंद होती. आणि हो नको तिथं पैसा उधळला नसता ना तर ही वेळ आली नसती."
"Ok, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे तर म्हणजे या सगळ्याला मी responsible आहे. मी पैसे उधळते.
जसा काही तू बरंच savings वैगरे केलं असल्यासारखं सांगतोय. तू ही तुझी ऐशोआरामाची हौस भागवलीसच की...तेंव्हा नव्हतं पैसा वाया जात..."
"हो...मी खर्च केला बराच...कारण मी कमवायचो...माझा पैसा होता तो..."
"आता तुझा झाला का?"
"झाला का म्हणजे काय...माझाच होता आधीपासून. तू काय इथं निवांत बसून मागणार. तू मागीतलास की मी आणून देणार. चूकच केली मी हे तुझे फालतू चे लाड पुरवून."
"कर blame अजून मला...आणि हो लक्षात ठेव...आज जे काय घर चाललय ना ते मीच केलेल्या savings मुळं..."
"मग काय उपकार केलेस माझ्यावर...saving केलं म्हणे...आणि हो हा विषय मला इथंच संपवायचा आहे.
Just leave me alone."
'ती रागात, द्वेषात निघून गेली. मलाही भयंकर संताप, मनस्ताप झाला या सगळ्यामुळे. इतके दिवस शांत राहिलो त्याचा हा परिणाम होता बहुतेक. उद्रेक वैगरे होतो म्हणतात ना ते झालं त्या दिवशी. त्या दिवसानंतर मात्र ही भांडणं रोजचीच होऊन गेली. सतत आपलं धुसफूस चालू असायची. कितीही नाही बोलायचं असं ठरवलं तरी बोललं हे जायचं आणि मग शब्दाला शब्द वाढत जायचे. परिस्थिती अनेकदा टोकाला जायची. कंटाळा आला होता मला या सगळ्याचा. तीन महिने हे असंच चालू होतं. आमच्यात संवाद कमी भांडणं जास्त व्हायची. छोट्या छोट्या गोष्टींमुळे राग यायचा. Smoking वाढलं होतं. अनेक गोष्टी बदलत होत्या. पण एक गोष्ट मात्र खटकायला लागली होती हल्ली. हिचं बोलणं चालू असलं तरी पैसा, सुख वैगरे गोष्टी कमी असायच्या हल्लीच्या आमच्या भांडणात.'
"तुझ्याशी जरा बोलायचं आहे. इकडे समोर ये."
"पटकन बोल मला बाहेर जायचं आहे. आणि हो मला वेळ नाहीय रिकामटेकडी नाहीय मी...please पटकन बोल."
"एक मिनिट...तुला वाटत नाहीय का तू जरा जास्तच बोलत आहेस...रिकमटेकडा म्हणे..."
"हेच सांगायचं होतं का तुला...please पटकन बोल."
"हल्ली तुझं हे बाहेर जाणं वैगरे वाढलंय...बहुतेक saving शिल्लक आहे वाटतं अजून...कुठून येतात पैसे तुझ्याकडून..."
"माझा पैसा आहे तो...आणि हो तुला काय करायचं आहे...तू बस इथं सिगारेटी फुंकत...आणि हो बस कर ते खूप झालंय..." Ash Tray मधल्या थोटक्यांकड बघून ती म्हणाली.
'शंका आली rather अनके शंका आल्या. ही अचानक अशी का बदलली असेल?....केवळ नोकरी गेली म्हणून...पैसे नाही म्हणून की आणखीन काही...आणि हल्ली ही इतके पैसे आणते कुठून...ही आपल्यापासून दूर जायचा प्रयत्न करतीय का...हीच कुठं affair वैगरे चालू आहे का...अनेक शंका...डोकं भणभणू लागलं होतं. Tension येत होतं...परिस्थिती......
आज दुपारीच घरी आलो मी. म्हणजे पदरी निराशा...अपमान सगळं कसं नेहमी सारखं चालू होतं. मी दरवाज्यापाशी आलो. घरात होणार अपमान सहन करायची तयारी करून...माझ्या keys ने मी दरवाजा उघडला. नेहमीसारखं नव्हतं आज...दारात कुणाचे तरी शूज होते. म्हणजे कोणी तरी तिसरी व्यक्ती घरात होती. दिसत तर कोणी नव्हतं. मी रूम कडे निघालो.'
" And what about your husband?" त्याने विचारलं.
"अरे तो येत नाही रे या वेळी...आणि का त्याचं नाव काढून mood off करतोय..."
"Ok... हो...आणि किती वेळ...we are getting late..."
"Ya.... झालंच...I am Ready...Lets go..."
"One thing you are looking so beautiful इन this outfit."
'सगळं ऐकत आणि बघत होतो मी...then he kissed her... सगळ्या शंका चुटकीसरशी दूर झाल्या. म्हणजे आपल्या बायकोचं दुसऱ्या कोणाबरोबर तरी affair चालू आहे ही गोष्ट पचत नव्हती...आणि समोर चाललेलं बघवत नव्हतं. प्रचंड चीड आली मला. मी एकदम रूम मध्ये गेलो आणि दरवाजा लावून घेतला आतून.'
"कोण आपण? आणि इथं काय करताय?" मी सभ्य होतो त्याच्याशी.
"अरे हा ना माझा मित्र...बरेच दिवसांनी भेटला...so ठरवलं की एकत्र lunch ला जाऊ...त्याच विषयी आम्ही बोलत होतो आणि तू आलास..."
ती बोलली आणि माझं डोकच सरकलं.
"डार्लिंग...किती cliche होतं ते...ठीक आहे मी ही थोडा cliche होतो...भेटायला आलेला मित्र बेडरूम पर्यंत ...व्वा! जवळचा मित्र असेल नाही."
"हे बघा तुम्ही समजताय तसं काही नाहीय...खरच we are good friends..."
"पुन्हा cliche dialogue... and I am so sorry... मी असा अचानक आलो...तुमचा mood off झाला असले नाही...काय darling... हो ना..."
आता मात्र दोघे घाबरले होते. समजूत घालत होते माझी.
"हे बघा तुम्ही बहुतेक आमचं बोलणं ऐकलंय. पण तसं काही नाहीय. म्हणजे तिचा म्हणायचा उद्देश तसा नव्हता."
असली फालतू कारण देत होता तो...
"अरे भेंचोद...तू माझ्यासमोर माझ्या बायकोला kiss करतो...ती माझ्याविषयी कायपण बोलत आहे...आहे आणि तू म्हणतोय 'असं काही समजू नका'..."
'सगळं आठवत होतं मागचं... अपमान, टोमणे, भांडणं... सगळं सगळं आठवत होतं. माझा फायदा उठवला हिनं... मी शांत बसतो याचा गैरफायदा घेतला...खूप राग आला मला...प्रचंड राग...आणि परत जेंव्हा ती बोलली माझ्याशी...then I was out of control... आमच्या रूम मध्ये माझी एक जुनी क्रिकेट बॅट होती...आठवण म्हणून ठेवलेली...ती नजरेत आली माझ्या.मी हातात घेतली बॅट... आणि ज्या क्षणी ती बोलली...मी बॅट घातली त्याच्या डोक्यात...मरेपर्यंत मारला त्याला...रक्त उडालं सगळी कडे...चार पाच वर झाले असतील...रक्त असं पसरत होत जमिनीवर...
ती रडायला लागली सगळं पाहून...खूप गयावया करत होती...Bitch... तिच्या पण डोक्यात घातली बॅट... सगळं अचानक शांत झालं... जास्त कष्ट नाही घेतले तिनं मरायला.... भयानक शांतता पसरली...ह्यांच रक्त जस जास्त पसरत चाललं होतं तसा मी अजून शांत होत होतो...द्वेष त्या रक्तात विरघळत चालला आहे असं वाटत होतं...भयानक सुख अनुभवत होतो मी त्यावेळी.....शांत झालं होतं सगळं...आणि बराच वेळ झालाय असं जेंव्हा लक्षात आलं तेंव्हा मी फोन केला तुम्हाला साहेब....तुम्ही आलात...तुम्ही इथं घेऊन आलात मला चौकीवर... And thats the whole story...'
पोलिसांनी काही विचारायच्या आधीच त्यानं हे बोलून टाकलं. घामाघूम चेहरा...लालबुंद झालेले डोळे...पोलीस अजूनही शांत होते...सुन्न झाले होते....
तो मात्र अजूनही शांत नव्हता.........
©gsumitt
The way in which u narrated the story was totally awsm...as expected🤗😊
ReplyDelete👍👍👍😊😊😊
DeleteNice one bro👌👌
ReplyDelete