भीती ?
हल्ली जास्त होतं असं...
प्रचंड प्रमाणात...
भीती वाटते... हो आजकाल ना प्रत्येक गोष्टीची भीती वाटतेय...क्षुल्लक का असेना त्याचं कारण भीती वाटतेय हे मात्र खरं आहे...
या सगळ्या मागे नेमकं काय कारण असेल?
मी स्वतः किती जबाबदार आहे या सगळ्याला... स्वतःला दोष द्यावा की समाजाला समजत नाही...
भीती मात्र आहे सगळ्याची...
मला याची कारणं न मिळण्यामागे देखील या भीतीचा हात नसेल ना?
हे साला असं होतंय... मी साधा दोषही नाही देऊ शकत कुणाला...सगळे एका बाजूला आणि मी एका बाजूला आहे असं सतत वाटत राहतं...
कारण अलीकडेच आपल्यात खूप गट पडत चाललेत...कुठल्याही गटात मी सामील होऊ इच्छित नाही...तरी यांची जबरदस्ती...वैयक्तिक विचाराला आता इथं किंमत नाही...प्रत्येक गटाने एकाला निवडलं...त्यानं "शब्द" नावाचं हत्यार अचूक फिरवलं...तसं ते प्रत्येक गटात फिरवलं गेलं...प्रत्येकाची धार वेगळी असली तरी...गटागटात रक्तपात झाले..."माणूस" मरत गेला...आता या सगळ्याला कोणीतरी थांबवावं...नाही नको...भीती वाटतेय...आपण नको...करतील बाकीचे...हो माहिते हे सगळं चुकीचं आहे...आवाज उठवायला हवा...पण आपण नाही पुढाकार घ्यायचा...आणि जरी कोणी घेतला...अशावेळी भेंचोद सगळे गट विखुरलेले का असेनात एकट्या माणसासाठी एकत्र येतील...कारण तो मारक आहे त्यांच्यासाठी...सगळे साले एकत्र येतील आणि कापतील त्याला...भीती वाटतेय त्या रक्तपाताची...
म्हणून समाज या दृष्टीनं भीतीचा विचार योग्य नाही वाटतं...असा विचार अजून भीती देतो...पोखरतो...हाती शून्य लागतं...
समाजाची सोडली तर वैयक्तिक पातळीवर देखील भीती भाव खाते...अगदी प्रत्येक पातळीवर...
आता प्रेम करण्याचं उदाहरण घ्या ना...समाज वैगरे पुन्हा त्यात मुद्दे आलेच...नको तिकडे जायला...म्हणजे खूप वैयक्तिक पातळीवर येऊ...
प्रेम explore करावं म्हणतात...नात्यातला गोडवा अनुभवा वैगरे असं therotical ज्ञान असतं आपल्याला...तसंच करत जातो आपण...या initial स्टेज ला एक भीती असते ती चुका घडण्याची...शी...किती बालिश झालं ना मागचं वाक्य...
आपण प्रेमात पडलोय हे कळताच आपल्या आजूबाजूला येऊन ज्ञान चोदणारे बरेच जण गोळा होतात...आणि ते नातं, प्रेम explore करणं वैगरे कसं भकास आहे याचं उदाहरणांसह स्पष्टीकरण देऊ लागतात...
आता इथं भीती वाटतेय त्या सगळ्यांच्या त्या भंपक सो कॉल्ड किस्स्याची...
एकीकडं विचार चालू होतो काय वाईट काय सांगतात ते...सेक्स ही need आहे...वाईट काहीच नाही...
आणि एकीकडं विचार असा येतो आपण आपले संस्कार नागडे करून गावात फिरवत आहोत...सगळे त्या नागड्या संस्कारावर हसत आहेत...आपल्या वर संस्कार करणारे आत्महत्या करत आहेत...तर मग ही भीती नेमकी कशाची...तसही वयात यायच्या आधी पॉर्न पाहून जर आपल्याला शरीराची ओळख झाली आहे...प्रेम, नातं या गोष्टी तर आपण कोलल्या आहेत...मग भीती कशाची...
शरीराची...मनाची...संस्काराची की ते आपल्यावर करणाऱ्यांची...
अजूनही नाही ना समजत की काय करावं...असा विचार केला की प्रेमात पडण्याची भीती वाटते...डोक्यात सतत विचार चालू असतात...मेंदूच्या प्रत्येक कोपऱ्यात एक विचार आणि एक भीती दडलीय... भीती त्या विचारांवर अतिक्रमण करत चालीय...भीती जशी वाढत जाईल तशी दुष्कृत्य वाढत जातील बहुतेक...दुष्कृत्य कोणती तर ते विचार संपवून टाकणारी...असं करत भीती एक दिवस ताबा घेईल का आपला...?
संपवायचं का भीतीला...पण कसं... विचार...पण कोणते...हे असलं काय पुन्हा डोक्यात आलं की नवीन भीती जन्माला येतेय...equal and opposite reaction...कळतंय का आपण आपल्याला संपवत चाललोय...हो रे...एक मिनिट...संपेल ना हे सगळं जेंव्हा आपणच संपू...भेंचोद आधी का नाही आलं लक्षात...आपण नाही तर आपले संस्कार नाहीत...ते नागडे विचार नाहीत...ते पलीकडं उभे असणारे गट नाहीत...तो विचारांचा रक्तपात होणार नाही...कोणाशी घेणं देणं नसेल...आपण एकटं असू ना त्या जगात...चल संपवू सगळं...
असा सगळा विचार...पण काय करावं... मी सामान्य...
मृत्यूची सुद्धा भीती वाटतेय हो....
काय करावं आता मी...
आक्रोश?
©sumit
Comments
Post a Comment