घराचा कोपरा
चार भिंतींच्या आड घरात एका कोपऱ्यात
अडकून पडल्यासारखं झालंय...
चार भिंती इतक्या भयानक वाटतात आता
की कधीही कोसळतील माझ्यावर...
पूर्वी याच चार भिंती आधार द्यायच्या...
आता जीवघेण्या झाल्यात...
पूर्वी तो कोपरा ओळखीचा होता...
तिथं वास होता आत्म्याचा...
आता तिथं फक्त शरीर उरलंय...
जाणिवांनी जीव सोडला...तिथंच त्या कोपऱ्यात...
तेव्हापासून तो तसा झालाय...
पर्णहीन झाडासारखा...कोरडा...
तसं घरात राहायला आवडायचं...
तिथं आपलं आपलं वाटायचं सगळं...
पण त्या कोपऱ्यात गेलं की समजतं...
खरा घात तर या घरानेच केलाय...
आधी आपलंसं करून घेतलं...
आता अडकवून ठेवलंय त्यानं...
तरीच मी विचार करत होतो...
घरचा तोच कोपरा मला का खुणावतो?
ते घर मला भाग पाडतं तिथं जाण्यासाठी...
कदाचित मी एकटा नाहीय...
इथल्या प्रत्येक कोपऱ्यात कोणी ना कोणी तरी अडकलं असणार आहे...
त्या शिवाय का त्या बाकीच्या कोपऱ्यातूनही आक्रोश ऐकू येतोय...
माझा आवजाही जात असेल का तिकडं?
का हीसुद्धा ह्या घराची एक चाल आहे...?
माझं घर इतकं वाईट वागेल असं वाटलं नव्हतं...!
कोपऱ्यातून उठून बाजूला जाऊ वाटत नाही आता...
कारण बाकीच्या कोपऱ्यातला आवाज गडद होतो...
माझा कोपरा मला पुन्हा आत खेचतो...
जाणिवा मरत नाहीत माझ्यातल्या तो पर्यंत तू सुद्धा इथंच अडकून राहणार असं बजावून सांगतो...
मला ऐकणं भाग आहे...
कारण कोपऱ्यापेक्षा घर अजून भयानक आहे...!
gsumitt
Waaaah🔥
ReplyDelete
ReplyDeleteJabardast... shabd nasate tar dukhane kititari jiv khaun takale asate...