Submission

कॉलेज सुटलं.वर्गातून बाहेर पडलो . जुलै चे दिवस होते . वातावरण थोडं पावसाळी झालं होतं.सगळ्यांना bye bye... उद्या भेटू वैगरे करून झालं...प्रत्येकानं आपली वाट पकडली. आम्ही पण आमची वाट पकडली.

"बाप्पा छत्री आणलीय का ? " सादिक नं विचारलं.
"नाही भावा...मी काय आता हवामान खात्यात कामाला आहे का ....मला काय माहित पाऊस पडणार आहे .... तसही अजून कुठं चालू झालाय....नुसतं आभाळ आलाय..." मी उत्तरलो.
त्या दिवशी राज आला नव्हता. राज असला कि त्याच्या कडे असायचं सगळं...छत्री,टोपी,रेनकोट....स्वतःला सांभाळत मित्रांची पण काळजी....
4.30 झाले होते....आम्ही पार्किंग कडे चालू लागलो....चालता चालता दोघं तिघं भेटले...गप्पा झाल्या...वायफाय लागतंय का ते बघून झालं....गाडी ला मग किल्ली लावली तेव्हा 5 वाजून गेले होते. आता मात्र अंधार वाढत होता. ढग गहिरे होत चालले होते. वारं इतकं होतं कि पाऊस जाईल अशी चिन्ह दिसू लागली....असाच काहीशी फकाट मारत बॅक gate पर्यंत पोचलो.आणि सादिक एकदम थांब बोलला...
"काय रे काय झालं" मी विचारलं.
"आंब्या विसरलास कि नाही....उद्या PP चं सबमिशन सांगितल आहे. फाइल आणि कागद घायचे आहेत.चल लवकर आत...नाय तर ते स्टोर बंद होईल मग बसा बोंबलत." सादिक त्रासिक स्वरात बोलत होता.
च्या मारी.... दोन वर्षात ज्यानं एकही सबमिशन वेळेत केलं नाही त्याला बरं आज काळजी लागलीय सबमिशन ची .... असं काही चालू असताना स्टोर आलं... नशीब आमचं कि उघडं होतं store ....
सादिक उतरला. लगबगीनं गेला पुढं ...." pages आणि files चा सेट द्या" तो त्या store वाल्या बाईला म्हणाला. बाप्पा तुला पाहिजेत का...त्यानं विचारलं.
या सबमिशन च्या घाईत मित्र आपल्याला विसरला याचं दुःख झालं पण त्याच्या परत विचरण्यांनं मन सुखावला. " आत्ता दिसलो होय मी तुला " अस म्हणत त्याला दोन शिव्या हासडल्या. तो हि हसला मी पण हसलो. Files आणि pages चे ते दोन गट्ठे सॅक मध्ये घातले.स्टार्टर मारला गाडीचा ....आणि अचानक पाऊस चालू झाला.
आईची या पावसाच्या .... दोघांनी पण थोडा थोडा वेळ पावसाचा उद्धार केला.पत्रीचा आसरा घेतला होता. थेंबाचा वेग वाढत चालला होता. पत्रयावरची टप टप वाढत चालली होती.
" आता हा काय थांबत नाही 1 तास भर " सादिक बोलला.
मी घडयाळ पहिले almost 6.30 झाले होते . म्हणजे घरी जायला आता 8 वाजतात असे वाटले.
" भाई उद्या नक्की सबमिट करायचं आहे का ? " मी विचारलं.
"मग काय ... कधी होणार लिहून...च्या मारी..." सादिक वैतागला होता.
"चला इथंच बसून लिहू...स्टडी रूम ला जाउया " मी म्हणालो.
" ठीक आहे. चल " सादिक ने होकार दिला.
वर पाहिलं...पाऊस कोसळत होताच...सॅक डोक्यावर घेतली....आणि त्या स्टडी रूम कडे प्रयाण केलं.
नाही म्हटलं तरी भिजलोच शेवटी...असुदे आता काय म्हणत आत गेलो. इतक्यात कार्याला अगदी तत्पर असणाऱ्या त्या watchman ने तोंडातील मावा सावरत रजिस्टर वर सही करण्याची ऑर्डर दिली. सही कार्ड असे सोपस्कार पूर्ण केल्यावर आम्हाला आत सोडलं. गर्दी नव्हती. थोडे फार लोक होते. शांत होतं. पावसाचा आवाज हि शांतता भंग करत होता. थोडा वेळ गेला. आम्ही 'त्या' वातावरणाशी settle झालो.
आणि ते जे काय सांगितलं होता ते लिहायला घेतलं.
कुठल्या तरी एका कंपनी ची manufacturing process , प्रॉफिट-लॉस ची माहिती होती. सर नी ते प्रिंट काढून वाटली होती. आणि हे उद्या लिहून आणा असं सांगितलं होतं. तसं बघायला गेलं तर त्या कंपनी चा आणि आमचा काही संबंध नाही. आमच्या ट्रेड शी रिलेटेड पण नाही. तरी पण ती 10 - 12 पानं आम्ही खरडु लागलो. हे सबमिशन म्हणजे 'Donkeywork' नुसतं.
जेम तेम 2 पानं लिहून झाली तेवढ्यात सादिक भाई नि आपलं तोंड उघडलं.
"लास्ट इयर चं पाहिलं सबमिशन, कसं वाटतंय मग" सादिक नं विचारलं.
"काय पण काय राव आता सवय झालीय....खूप दिवसांनी पेनातील शाई भासभास संपतीय याच दुःख आहे इतकंच. पण काय रे साल्या या आधी तू कधी वेळेत सबमिशन केला नाहीस...मग आज  काय झालय   कि चक्क सादिक भाई सबमिशन च्या पाठीमागं लागलेत??" मी विचारलं.
असं विचारल्यावर त्यानं लिखाण बंद केलं. आणि तो उत्तर देऊ लागला.
"हे बघ...मागच्या दोन वर्षात आपण काय काय केलं हे तुलाही माहिते मलाही माहिते. सगळे टीचर्स आपल्या नावानं शिव्या घालत असतात. कोण आपल्या कडे चांगलं असं म्हणून बघत नाहीत. मार्कांवर परिणाम होतोय रे याचा. तरीही आता लास्ट इयर आहे. केला कि दंगा दोन वर्ष....थोडं होऊया कि sincere ... सो सगळं चाललंय बघ..." सादिक नं उत्तर दिलं.
मला आता काय बोलावं सुचेना. मी फक्त हसलो आणि पुन्हा लिहण्याचा प्रयत्न करू लागलो.पाऊसचा जोर कमी होत चालला होता.
पण सादिक बोलला ते खरंच तर होतं.
मागच्या दोन वर्षात दंगा करण्यापलीकडं केलं तरी काय आपण... पाट्या टाकायच्या नुस्ता.... सबमिट करा म्हटलं कि तेवढ जे काय आहे ते खरडायच आणि नेऊन द्यायचं.... हि असली कामं आम्ही कधीच वेळेवर केली नाहीत. सर जो पर्यंत नाव घेऊन सांगत नाहीत तो पर्यंत आम्ही काय केलं नाही. अगदी सुरवातीला नवीन नवीन असताना केलं होतं सगळं आठवतंय मला... पण नव्याचे नऊ दिवस... जसा रूळत गेलो तसं शिंगं फुटली आणि शिस्तीवर बेशिस्त पणाची झालर ओढवून घेतली. "राहूदे रे... काय करतील " असं।म्हणत सगळं काही फाट्यावर बसवलं... आणि मनमुराद पद्धतीनं कॉलेज लाईफ चा आस्वाद घेतला. पाहिजे तेवढी lectures करायची... कॅन्टीन वर timepass करायचा... गार्डन मध्ये जाऊन fakat मारत बसायचं...दररोज जाताना "साई" या गाडयवरची दाबेली खायची..... आणि घरी परत..... हे सर्व आमचं नित्य नियमानुसार चाललं होतं.... दोन वर्षाचा लेखाजोगा मांडायचा झाला तर वरील गोष्टींशिवाय कायंच केलं नव्हतं असं लक्षात आलं. पण याचं दुःख नाही वाटत... कारण या अश्या बाहेरच्या अनेक गोष्टी मधून शिकायला मिळालं... माणसं ओळखायला यायला लागली... कॉलेज लाईफ ची काळी बाजू ओळखून आली... मर्यादांची जाणीव झाली...
सादिक इतकंस बोलून गेला...पण विचार काय जात नव्हते मनातून.... हे विचार मनात चालू असले तरी सबमिशन नावाचं गाढवकाम चालूच होतं... लक्ष नव्हतं त्यात...काय फरक पडतो लक्ष असुदे अथवा नसुदे... नुसतं इकडच तिकडं तर करायचं होतं..
पाऊस पूर्ण थांबला होता. एक मंद सुवास पसरला होता. वारं गार झालं होतं. बोलता बोलता लिहून कसं झालं ते समजलाच नाही.
"झालं" सादिक नं सुस्कारा सोडला. हाताची बोटे मोडली. मानेला जरा ताण दिला. सगळं आवरलं. आणि आम्ही तिथून निघालो.
त्या दिवशी कॉलेज मधून बाहेर पडताना एक possitivity होती मनात.
"काय राव एकदम परिवर्तन कसं काय तुमच्यात" मी विचारलं.
"काय नाही असंच वाटलं.... एखादं काम करूया वेळेवर आणखी काही नाही बस..." सादिक बोलला.
त्या दिवाशी त्याच्यात काय बदल झाला काय समजत नव्हतं. नुसत्या एका विचारानं तो इतका बदलला होता.
त्यानं नुसता विचार केला नव्हता तर तो implement केला होता. कौतुक वाटलं सल्याचं. त्याच्याकडं हा हि गुण आहे हे मला त्या दिवशी समजलं.

घरी जायचा प्रवास चालू झाला. आमची फकाट चालू झाली. चिखल तुडवत, ते सुगंधित गार वारं घेत आम्ही पुढं निघालो. जोक्स मारत गप्पा मारत आम्ही निघालो.
पहिल्यांदाच नवीन दिवसाची इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो.
कदाचित एक नवीन सुरवात होईल असं काहीसं वाटत होतं.
©Gsumitt

Comments

Popular posts from this blog

Friendship

The Result

Bike Mates