असं का ??
"तू माझ्या आयुष्यातून निघून जा" इतक्याश्या वाक्यात तिनं सारं काही संपवून टाकलं ....तिच्या मते....
ती इतकंस बोलली आणि चटकन निघून गेली....मी मात्र तिथंच...निःशब्द.... एक भयंकर शॉक मिळल्यासारखा उभा होतो....स्तब्ध....ती नजरेसमोरून जात नाही तो पर्यंत मी पाहत होतो तिच्याकडे....तो पर्यंत मी कोणताच विचार केला नाही....म्हणजे माझ्या मनातही काही आलं नाही....जस कि तिला जाऊन थांबवावं....तिला विचारावं पुन्हा एकदा....समजूत घालावी....काहीच नाही आलं मनात....जेव्हा ती नजरेच्या कक्षेतून निघून गेली तेंव्हा वाटलं की आपण स्वीकारलं का तिचं निघून जाणं.... कि आपण आता आपण हरलोय या प्रेमात...
काहीच समजत नव्हतं....पण साला इतक्या दिवसांचं नातं असं एका दमात कसं काय तुटू शकत ?
नातं....प्रेम....सहवास....साला काय अजीब गोष्टी आहेत ना....आपण यात अडकत जातो खरे...पण बाहेर यायची वेळ आली की समजतं आपले हात पाय बांधले गेले आहेत...एका कोणत्यातरी अदृश्य अश्या विणी मध्ये...आपण जिवाच्या आकांताने ती वीण सोडायचा प्रयत्न करतो...कारण आपल्याला त्यातून सुटायचं असतं.... मोकळं व्हायचं असत....एका पॉईंट ला ती नात्याची वीण तुटते.....खूप त्रास होतो ना त्यावेळी....ती वीण तशीच तुटन पडून राहते....आपण निघतो आपल्या दुःखात....मग आपण आपलं दुःख लोकांना explain करतो...लोक आपलं सांत्वन करतात....सगळं विसर म्हणतात....जाऊ दे झालं ते झालं....असं म्हणत आपण आपल्या वाटेला लागतो....आपण आपला विचार करतो....पण ज्यानं ती नात्याची वीण विणली होती त्याचा कोणीच विचार करत नाही....म्हणजे आपलं दुःख आपण विसरून।जातो एका क्षणात....पण त्या तुटलेल्या नात्याकडे पाहून ते नातं जोडणाऱ्याला काय त्रास झाले असतील याचा विचारही करत नाही....पण त्याने पुन्हा ती वीण जोडायचा प्रयत्न केला तर....ती पुन्हा जोडली हि जाईल....पण त्याला ती पूर्वीची ताकद नसेल....नात्याची ती ऊब नसेल....मुळात म्हणजे ते।नातंच त्या विणी सारखं उसवलेलं असेल....
हे सारं असं असतानाही मी ती वीण घट्ट करायची का असा विचार माझ्या मनात कायम यायचा....पण हा विचार कायम अश्रूंच्या वाटे मोकळा व्हायचा....कारण अश्रूच कायम जवळ असायचे माझ्या....अजूनही ती जेंव्हा डोळ्या समोर येते ना तेंव्हा हेच अश्रू मध्ये येतात....आणि सारं चित्र धूसर....विसरायला भाग पाडतात साले.....आणि मी हि कायम एकच प्रश्न विचारत राहतो त्यांना आणि तिला....
"का?"
©gsumitt
Ek number bellya
ReplyDelete