काळ जसा पुढं जाईल तश्या अनेक गोष्टी clear होत जात असतात.
नवीन आलेल्या दिवसात मग आपल्याला कळत जातं की आपला गेलेला काळ किती fucked up होता.
मग त्या त्या काळात भेटलेली माणसे...... त्यांचे खरे चेहरे आपल्याला समजून येतात... हे सर्व स्वतःहून समजेल असं नाही.... कारण कालानुरूप या गोष्टी समजत जातात.
आणि माणसाचा खरा चेहरा समोर येतो तेव्हा त्या काळी घडलेल्या गोष्टींची समीकरणे आपण मांडत बसतो.... त्यातली काही सुटतात काही नाही सुटत.... तरी काही झालं असलं तरी थोडं वाईट हे वाटतंच .... राग हि येतो.... पण आत्ता वाईट वाटून घेण्यात काही पॉईंट नसतो.... राग राग करण्यात अर्थ नसतो....
प्रत्येक वेळी गेलेला काळ हा fuked up असेलच असे नाही. त्या काळच्या अनेक चांगल्या आठवणी.... चांगले क्षण हि मग आपल्या सोबत असतात..... तेच आपल्या पुढच्या काळासाठी एक ताकद ठरू शकतात.....
मग आता प्रश्न उरतो त्या वाईट भूतकाळाचा त्याच करायचं काय....
मग आपल्या समोर दोन गोष्टी असू शकतात..... एक म्हणजे "memory" आणि दुसरी म्हणजे fact....
"त्या" गेलेल्या काळातील वाईट गोष्टी या "memory" या साच्यात ठेवायच्या आणि भेटलेली वाईट माणसे किंवा वाईट प्रवृत्ती ह्या " fact" च्या साच्यात ठेवायच्या.....
कारण "memory" हि volatile गोष्ट कितीही sharp असली तरी.... so ती लगेच डोक्यातून जाते....
आणि fact हि गोष्ट एकदम पक्की...
So जे कोणी आपल्याशी वाईट लागलेत.... आपल्याला कमी लेखलाय.... अश्या व्यक्ती आणि प्रवृत्ती यांना fact म्हणून लक्षात ठेवण्याची गरज जास्त आहे....
कारण आजच्या या स्पर्धेच्या युगात "हा" fact आपल्या यशस्वीतेसाठी महत्वाचा ठरू शकतो.... आणि आपली हि यशस्वीता त्या वाईट प्रवृत्ती साठी चपराक ठरू शकते....
कारण कृतीतून दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी अधिक उठावदार असतात.....
आणि गोष्ट ती चांगल्या आठवणींची....
त्या कमी जरी असल्या ना तरी त्या पुरेश्या असतात.... आणि आपल्या वर्तमानाच्या दुःखात त्या रामबाण औषध म्हणून कामी येऊ शकतात.....
शेवटी काय वर्तमानात भूतकाळ reflect होऊ द्यायचा नाही.... आणि जर झालाच तर मग आहे ना वर सांगितल्या प्रमाणे.....
Memory आणि Fact 😊
©gsumitt
Friendship
मैत्री....दोनच अक्षरं या शब्दात....पण एक प्रकारचं जग सामावल आहे या शब्दांत.... मैत्री हे असं एकमेव नातं आहे जे तुटू शकतं पण विसरता नाही येऊ शकत...मित्र लांब जाऊ शकतात पण मैत्री लांब ...
Comments
Post a Comment