कॉपी : आठवणीतली एक आठवण
आपण शिकायला चालू करतो....मग अभ्यास आपल्या पाठी लागतो आणि अनेक परीक्षा आपल्या गळ्यात मारल्या जातात...हो गळ्यातच मारल्या जातात....अगदी शाळेपासूनच...
शाळेत असतानाच आठवतंय मला दोन दोन महिन्याला त्या चाचणी परीक्षा मग सहामाही मग आणि दोन चाचण्या आणि शेवटी वार्षिक....असं काय ते कंटाळवाणं सगळं....मला कळत नाही हे लोक इतक्या परीक्षा घेतात कशाला....परीक्षा घेतात ते घेतात आणि वर सगळ्यांना पास करायचं असा नियम मग त्या परीक्षांचा घंटा उपयोग....!!
आता clg कडे वळूया....
शाळेमध्ये शिस्त लावताना एक वाक्य कॉमन असावं कि " हे काय clg आहे होय असल्या गोष्टी इथं काय चालायचा नाहीत..."
असं जेव्हा शिक्षक बोलतात तेव्हा आपल्या मनात काय येता आयला clg मधल्या पोरांचं लै भारी काम आहे राव....कस पण या....कधी पण या....कधी पण जावा...!!
असाच काहीसं मनात धरून मी clg ला गेलो आणि लक्षात आलं कि या केवळ अफवा आहेत....अर्थात आमचं clg... the ग्रेट ..!!
नंतर समजलं मला आपण दुसऱ्या शाळेतच आलो आहोत....आता शाळेचा अर्थ इथं काय हे वाचणाऱ्याने ठरवावे...!! 😉😉
मागच्या एका ब्लॉग मध्ये मी म्हटलं होतं तर clg ने दिलेल्या आठवणी बद्दल....आणि त्यातली एक आठवण म्हणजे exam ला होणारी कॉपी...म्हणजेच आम्ही केलेली कॉपी....!! 😂😂
इंजिनीरिंग ची पोरं आम्ही .... फक्त PL मध्ये अभ्यास करणार...आणि मार्क पडणार....पण हे इतकं सोप्पं नसतं engineer चं life.... मगाशी म्हटलं ना या ढीगभर परीक्षा मेन सेम च्या आधी....
युनिट टेस्ट....स्किल टेस्ट....प्रॅक्टिकल्स... external exam आणि मग बोर्ड ची एक्साम...
बोर्ड एक्साम सोडायची आणि राहतात त्या मग clg च्या परीक्षा....विषय वेगळे...शिकवणारे सर वेगळे(obviously) .... वेळ वेगळी....पण एक गोष्ट कॉमन...ती।म्हणजे कॉपी....
आपली शिक्षण पद्धती बघता बोर्ड exam पेक्षा इंटर्नल मार्कांना महत्व जास्त...आणि त्यात इंटर्नल चे पेपर म्हणजे डोक्या वरून पाणी....मार्क पडायचे असतील तर अभ्यासा शिवाय अजून एका गोष्टीचा आधार असतो आम्हाला ती म्हणजे कॉपी...!!
युनिट टेस्ट चं टाईम टेबल लागलं कि बाकीचे कसे अभ्यासाचं "नियोजन" चालू करतात....आम्ही करायचो ते कॉपी चं नियोजन....
कॉपी चं नियोजन म्हणजे भन्नाट काम....कोण कुठल्या टॉपिक चा स्टडी करणार त्या पासून ते चिठ्ठया कुठं ठेवायच्या ते इथं पर्यंत...!! तरी पण थोडं काही अभ्यासतला वाचावं तर लागताच ना ... शेवटी कॉपी असली तरी अभ्यास हा करावाच लागतो....!!
असे मग भरपूर दिवस मध्ये बोंबलत घालवल्यावर येतो तो एक्साम च्या आधीचा दिवस...वाटतं कि अभ्यास करावा मग कॉपी चा विचार डोक्यात येतो आणि पांघरूण डोक्यावर येतं.....!!
सकाळी 10 ला पहिला पेपर असायचा .....
तरी पण 8 ला clg मध्ये हजर.... पुस्तक वाचायचं नाटक करायचं थोडा वेळ आणि मग नंतर महत्वाच्या कामाला हात घालायचा....😉😉
Clg exam चा फायदा म्हणजे answer sheet बाहेरून आणायला सांगायचे....आणि ती एक पर्वणी ठरली आमच्या साठी.....exam च्या आधी ची question bank द्याचे आम्हाला....आणि सांगायचे यातीलच प्रश्न करून या....(कधीही यातले प्रश्न पडले नाहीत हि गोष्ट।वेगळी ) so risk नको म्हणून आम्ही याची उत्तरं आम्ही लिहून घायचो डायरेक्ट ans sheet वर....एखाद दुसरा प्रश्न तरी पडायचा आणि 5 6 मार्क ची जुळणी होत असे.....हा एक प्रकार....
दुसरा प्रकार म्हणजे मोबाईल मध्ये फोटो मारून ठेवायचे....जसा काळ जाईल तसे आम्ही या प्रकारात expert होत गेलो....expert म्हणजे आधी म्हणजे सुरवातीला नुसते फोटो मारायचो....नंतर मग।फोटो मारायचो वर आणि chapter wise फोल्डर तयार करायचो....शोधायला सोप्पं..!!
मग यात आणि प्रकार पडायचे झाले तर आहेतच ना जुन्या methods.... विचारून लिहिणे....चिठ्ठया ठेवणे....या प्रकारांचा आम्ही सहसा वापर केला नाही....केला तो अगदीच आणीबाणीच्या परिस्थिती मध्ये....आणीबाणी म्हणजे काय तर काही supervisor ans sheet चेक करायचे मग धांदल उडायची....त्या वेळी मग थोडा केलेला अभ्यास कामी यायचा .... मित्रांची ( अर्थात the great मित्रांची ) मदत व्हायची... आणि आमची गाडी 12 ते 15 वर येऊन थांबायची....😃😃
ग्रेट मित्र म्हणजे grp मधली अभ्यास करणारी पोरं.... grp कितीही कॉपी करत असला..."गैरमार्गाचा" वापर करत असला तरी एखाद दुसरा असतोच ना "प्रामाणिक" "स्वभावाने गरीब" .....!!
कॉपी करणं नंतर नंतर एक faltu काम वाटू लागलं.... कोण चेकिंग करायचं नाही...कि supervision म्हणून कोण फिरकायच नाही....त्यांनाही कदाचित या सर्व प्रकाराबद्दल कल्पना असावी.....किंवा त्यांनी देखील आपल्या clg time ला कॉपी केली असावी...😋😋....असो..😉
शेवटची ती exam आठवतीय मला....मला का आमच्या grp च्या सगळ्या पोरांना आठवत असेल....
पेपर चालू झाला होता....ans sheet वर लिहून आणलेलं मी उतरवून काढत होतो...आणि एकदम माझ्या कानावर शब्द पडले....
"नाही सर ते माझ्या कडे पुस्तक नव्हतं म्हणून मी फोटो काढलेत सर....मी नाही बघून लिहलं..."
समजलं सापडलं कोण तर.....आता मात्र पंचाईत झाली...माझं तर जेम तेम 8।मार्क चं complete झालं होता...आणि सर नि चेकिंग चालू केलं....मी पहिला सगळं खोडून टाकलं....चिठ्ठ्या safe जागी लपवल्या....पुरावे नष्ट केले....आणि लिहण्याचा आठवत असल्याचं नाटक करत होतो....कारण अभ्यासाच्या नावानं शंख....इतक्यात सर माझ्या जवळ आले...अर्थात मोबाईल चेक केला कारण प्रथम सापडला होता तो मोबाईल .... हायसं वाटलं त्या वेळी कारण मी त्या पेपर वेळी मोबाइल फोटो काढले नव्हते....मग खिसे तपासले...pouch चेक केला....आणि सर पुढं गेले....आणि मी सुटकेचा निःश्वास सोडला....त्यावेळी समजलं गुन्हेगार कितीही तरबेज असला तरी त्याला पकडणार असं वाटलं कि त्याचीही बोबडी वळतेच..!!
असं झालं त्या दिवशी .... आणि शेवटची ती exam .... कॉपी मुळं गाजली.....नंतरच्या पेपर ला अभ्यास काय असतो ते समजलं....!!!
मग दिवस संपले.....clg झालं... बोर्ड exam पण झाली....पण तो दिवस अगदी आजही डोळ्या समोर आहे...त्यादिवशी समजलं कॉपी करणं हा गुन्हा नाही तर कॉपी करताना सापडणं हा मात्र घोर अपराध आहे...!!!
***
सूचना : वरील लेख हा केवळ मनोरंजन या साठी लिहला आहे. याचा वास्तवाशी संबंध नाही. मी कॉपी सारख्या गैर प्रकारचे समर्थन करत नाही.
धन्यवाद.
©gsumitt
Yooooooo bellya
ReplyDeleteYooooooo bellya
ReplyDelete